Breaking News

 

 

कोल्हापुरात रविवारी ‘सायक्लोथॉन’ स्पर्धा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डेक्कन स्पोर्टस क्लबतर्फे रविवार (दि.२) जून रोजी डेक्कन सायक्लोथॉन स्पर्धा शिवाजी विद्यापीठ ते आडी, आप्पाचीवाडी, लक्ष्मी टेकडी ते शिवाजी विद्यापीठ मार्गे पार पडणार आहे. ही स्पर्धा २० किलोमीटर, ५० किलोमीटर आणि १२० किलोमीटर अशा ३ टप्यामध्ये  ही सायकल स्पर्धा होणार असल्याची माहिती डेक्कन स्पोर्टस क्लबचे उदय पाटील, जयेश कदम, वैभव बेळगावकर यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

यातील १२० किलोमीटरची स्पर्धा अठरा वर्षे वयोगटाच्या पुढील स्पर्धकांसाठी खुली आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठ ते संकेश्वर असा मार्ग राहणार आहे. यामधील विजेत्या आठजणांना बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये ९० स्पर्धक सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे.

५० किलोमीटरसाठी शिवाजी विद्यापीठ ते आडी-आप्पाची वाडी व पुन्हा शिवाजी विद्यापीठ असा मार्ग असून यामध्ये वय वर्ष १६ च्या पुढील एकुण १६० स्पर्धक सहभागी झाले आहेत. तसेच २० किलोमीटर अंतराची स्पर्धा ही शिवाजी विद्यापीठ ते लक्ष्मी टेकडी व पुन्हा शिवाजी विद्यापीठ पर्यंत आहे. या स्पर्धेसाठी एकुण ६० स्पर्धक सहभागी झाले आहेत.
 
या स्पर्धेमध्ये एकूण १ लाख २० हजारांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश, हैद्राबाद, तामिळनाडू,मद्रास व कोल्हापूर आदी ठिकाणचे ३०० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे उदघाटन माजी आ. मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, विश्वविजय खानविलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी अमर धामणे, अभिषेक मोहिते, अतुल पवार, संजय चव्हाण, समीर चौगले, प्रशांत काटे उपस्थित होते.

192 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे