Breaking News

 

 

विश्वजित कदम यांचा भाजप प्रवेशाबाबत मोठा खुलासा !

सांगली (प्रतिनिधी) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम ही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला वेग आला होता. यामुळे सांगली जिल्ह्यात अगोदरच कमकुवत झालेल्या काँग्रेसला पुन्हा मोठे खिंडार पडणार असल्याचीही चर्चा होती. मात्र विश्वजित कदम यांनी याचा इन्कार केला आहे. याबाबत त्यांनी आज (बुधवार) पत्रक जारी केले आहे.

कदम यांनी पत्रकात म्हटले आहे की, मी मागील दोन दिवसांपासून मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त काही वाहिन्यांवरून, वृत्तपत्रातून, सोशल मिडीयावर प्रसारित होत आहे. मात्र हे वृत्त निराधार असून यात कोणतेही तथ्य नाही. यामुळे कदम हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला पूर्णविराम मिळाला आहे.   

5,697 total views, 12 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे