मुंबई : आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर शेअर बाजारात घसरण दिसून आली. बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. १०.८४ अंकांच्या घसरणीनंतर ६२,६१५.५२ अंकांवर तर, निफ्टी निर्देशांक १८,६३८.८५ अंकांवर खुला झाला.

आज रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले. आरबीआयने पतधोरणात जाहीर करताना रेपो दरात वाढ केली. त्याचा परिणाम बाजारावरही दिसून आला. बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारला होता. त्यानंतर घसरण सुरू झाली.

रेपो रेट वाढीचा परिणाम थेट होम, कार आणि पर्सनल लोन यांच्या मासिक हप्त्यावर होणार आहे. या आधी आरबीआयने रेपो दरात ०.५० बेसिस पॉईट्सनी वाढ केली होती. आता पुन्हा रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकात ०.३५ बेसिस पॉईंट्सनी रेपो दर वाढवण्यात आला आहे. एका वर्षांत तब्बल पाचव्यांदा रेपो दरात वाढ झाली आहे. मे-सप्टेंबर महिन्यात आरबीआयने रेपो दरात १.९० टक्क्यांनी वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा थेट परिणाम कर्जदारांच्या खिशावर पडणार आहे.

रेपो दरात वाढ झाल्याने कर्जदारांच्या व्याजदरांवर होऊन कर्जाचे हप्ते वाढणार आहेत. विशेष म्हणजे जानेवारीपासून महागाई दर ६ टक्क्यांवर पोहोचला आहे.वाढती महागाई ही रिझर्व्ह बँकेच्या मर्यादा पातळीपेक्षा अधिक आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआय सातत्याने रेपो दरात वाढ करत आबे. मागील गेल्या दीड वर्षांत रेपो दरात सातत्याने वाढ झाली आहे.