मुंबई (प्रतिनिधी) : किंग खानचा पुत्र आर्यन खान याने सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या पहिल्या वहिल्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. त्यावरून आर्यन अभिनय क्षेत्रात नव्हे, तर दिग्दर्शनात उतरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्यन दिग्दर्शक म्हणून त्याच्या करिअरची सुरवात करत आहे.

६ डिसेंबरच्या या पोस्टमध्ये आर्यन म्हणतो की, माझे लेखन काम पूर्ण झाले आहे. आता शूटिंग सुरु करण्यासाठी मी अधिक वाट पाहू शकत नाही. लवकरच मी ‘रेड चिली प्रॉडक्शन’ सोबत शूटिंग सुरु करणार आहे.’ आर्यन हा चित्रपट की वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याने नेहमीच दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि त्या संदर्भातच त्याने प्रशिक्षण घेतले आहे.