कोकेनची ‘२४६’ पाकिटं गिळल्यामुळे तस्कराचा मृत्यू…

0 1

जपान (वृत्तसंस्था) : कोकेनची तस्करी करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या  जपानमधील नागरिकाचा विमान प्रवासातच मृत्यू झाला आहे. या नागरिकाने अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी कोकेनची २४६ पाकिटं गिळली होती. कोलंबियामधील बोगोटा ते टोकियो दरम्यान विमान प्रवासातून तस्करी करण्याचा तो प्रयत्न करीत होता. पण त्याचा हा प्रयत्न जीवावर बेतला आणि त्याचा मृत्यू झाला.

या तस्कराने बोगोटा ते मेक्सिको शहरादरम्यान प्रवास केल्यानंतर जपानला जाणाऱ्या विमानाने पुढील प्रवास सुरु केला होता. विमानातील कर्मचाऱ्याला या प्रवाशाची प्रकृती अस्वस्थ असल्याचं लक्षात आल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. या प्रवाशाने कोकेनची २४६ पाकिटं गिळली होती. प्रत्येक पाकिट १ ते २.५ सेंटीमीरटरचं होतं. शवविच्छेदन अहवालात पोटात कोकेनची पाकिटं असल्याचं निदर्शनास आले. अंमली पदार्थांचा अतिरेक झाल्यानेच मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More