Breaking News

 

 

अध्यक्षपदाबाबत राहुल गांधींचे घुमजाव !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्याच्या प्रस्तावावर ठाम आहेत. त्यांनी राजीनामा देऊ नये अशी विनंती पक्षातील नेते त्यांना करत आहेत. राहुल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी नेत्यांच्या भेटी वाढल्या आहेत. स्वत: प्रियांका गांधी यांनी देखील राहुल यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नाला यश आले असून राहुल गांधींंनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयारी दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष बदलाच्या केवळ चर्चाच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राहुल गांधी काही अटींसह आपला राजीनामा मागे घेण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी आपल्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. सोमवारी काही नेत्यांनी राहुल गांधींची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल यांनी कुणालाही भेटण्यास नकार दिला. राहुल गांधी यांच्या राजीनाम्याविषयी निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी या आठवड्यात काँग्रेस कार्यकारिणी किंवा पक्षाचे वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. 

राहुल गांधी पुढील दोन दिवसांसाठी वायनाडच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. अमेठीत झालेल्या पराभवानंतर त्यांच्या वायनाड दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. दरम्यान, राहुल यांचा राजीनामा फेटाळून लावत पक्षात महत्त्वाचे बदल करण्यासाठी त्यांना सूट देण्यात आली आहे. यासाठी पक्षाच्या घटनेत देखील बदल करण्यात येतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

762 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा