विखे-पाटील यांचा प्रवेश निश्चित, मुहूर्त बाकी ! : गिरीश महाजन

0 2

मुंबई (प्रतिनिधी) : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित आहे. केवळ मुहूर्त बाकी आहे. तारीख ठरायची आहे,’ असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांची आज (मंगळवार) मुंबईत भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

काँग्रेस पक्षाने सुजित विखे-पाटील यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपचा पर्याय निवडला होता. मुलाला भाजपची उमेदवारी मिळवून देऊन मोठ्या मताधिक्याने निवडूनही आणले. त्यामुळे आता विखे-पाटील यांचे राजकीय वजन वाढले आहे. भाजप प्रवेशानंतर राज्यातील सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा वर्तवली जात आहे. या भेटीत त्यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तो मुहूर्त आणखी लांबणीवर पडला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणालाही काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये राहण्याची इच्छा नाही. विखे यांच्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा त्यांनी यावेळी केला.





 


Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More