कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राजकीयदृष्ट्या महत्वाचे मानले जाणाऱ्या कोल्हापूर दक्षिणमधील कळंबा ग्रामपंचायतच्या तब्बल नऊ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे.

अर्जांची छाननी पाच डिसेंबर रोजी असतानादेखील सहा डिसेंबर दिवशी रात्री निवडणूक अधिकाऱ्यांनी नऊ जणांना अपात्र ठरविल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यातच कळंबा ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवडणूक लढवणाऱ्या चारही महिलांच्या पतींचेही फोन दुपारपासून स्विच ऑफ लागत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यातील काहीजण कोल्हापुरातील सयाजी हॉटेल परिसरात दिसून आले. त्यामुळे अनेक जर-तरच्या चर्चांना उधाण आले आहे.