Breaking News

 

 

बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज  (मंगळवार) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ८५. ८८ टक्के इतका असून यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.

विद्यार्थ्यांना दुपारी १ पासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. राज्यभरातून बारावीच्या परीक्षेत १४ लाख २३ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख २१ हजार ९३६ इतकी होती.

यात मुलींची संख्या ६ लाख ३० हजार २५४ तर मुलांची संख्या ७ लाख ९१ हजार ६८२ इतकी होती. यातील १२ लाख २१ हजार १५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याचा निकाल ८५. ८८ टक्के इतका लागला आहे. गुण पडताळणीसाठी २९ मे ते ७ जून आणि छायाप्रतिसाठी २९ मे ते १७ जून या या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे.

492 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे