Breaking News

 

 

झारखंडमधील स्फोटात ११ जवान जखमी

रांची (वृत्तसंस्था) :  झारखंडमधील सरायकेला येथे नक्षलींनी घडवलेल्या स्फोटात ११ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना हेलिकॉप्टरने रांची येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. आज (मंगळवार) पहाटे सरायकला येथे कोब्रा फोर्स आणि झारखंड पोलीस यांच्या संयुक्त पथकाने जंगलात विशेष मोहीम राबवली. यादरम्यान नक्षलींनी आयईडीद्वारे स्फोट घडवला. या स्फोटात कोब्रा फोर्समधील ८ जवान आणि झारखंड पोलीस दलातील तीन जवान जखमी झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये नक्षलग्रस्त भागांमध्ये नक्षलींच्या कारवाया वाढल्या आहेत. दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मंडावी यांचा व सुरक्षा दलातील चार जवानही मृत्यू झाला. यानंतर १ मे रोजी नक्षलींनी गडचिरोलीत भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. तर खासगी वाहनाच्या चालकाचाही यात मृत्यू झाला होता.

त्याच मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदारांच्या ३६ वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार १५ जवान घटनास्थळाच्या दिशेने जात असताना जांभुळखेडा-लेंडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात हे जवान शहीद झाले होते.

273 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा