Breaking News

 

 

‘कचरा लाख मोलाचा अभियान’ यशस्वी करण्यासाठी योगदान द्या : आयुक्त डॉ. कलशेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एक जूनपासून शहरातील कचरा वर्गीकरण करूनच स्वीकारला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. कचरा लाख मोलाचा हे अभियान यशस्वी होण्यासाठी शहरवासीयांनी योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. एम. एस. कलशेट्टी यांनी केले. या अभियानाचा लाईन बाजार, हनुमान मंदिर येथे प्रारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

कमीतकमी कचरा करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे या त्रिसूत्रीचा वापर यापुढे आवश्यक असल्याचेही डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले. यावेळी आठ प्रकारच्या कचऱ्यातून पैसे मिळवणे शक्य आहे. कचरा वर्गीकरण करून दिल्यास खत व बायोगॅसची निर्मिती करणे शक्य आहे. असे अनिल चौगले यांनी सांगितले. यावेळी शरद कुभार यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला महापौर सौ. सरिता मोरे, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेविका सौ. माधुरी लाड, सागर यवलुजे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील तसेच भागातील नागरिक उपस्थित होते.        

495 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग