Breaking News

 

 

मंडलिक कारखान्याची उर्वरीत एफआरपी रक्कम जमा…

हमिदवाडा (प्रतिनिधी) : सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी  साखर कारखान्याने सन २०१८-१९ या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे उर्वरीत प्रती टन ६०८ रुपये प्रमाणे होणारी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज (सोमवार) रोजी वर्ग  केल्याची, माहीती कारखान्याचे चेअरमन, खा. संजय मंडलिक यांनी दिली.

सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामात  सरासरी १२.९२% उताऱ्यासह ४,६६,४४३ मे.टन उसाचे गाळप करून ६,०५,५०० क्विंटल साखरेचे उत्पादन  केले. या हंगामाची एफआरपी प्रतीटनास २,९०८ रुपये इतकी आहे. गाळप केलेल्या ऊसाची प्रति टन २,३०० रुपये प्रमाणे संपूर्ण रक्कम यापुर्वी अदा केली  आहे. आर्थिक उपलब्धीनुसार  एकुण गाळप ऊसापैकी दिनांक १३-११-२०१८ ते १५-१२-२०१८ अखेर कालावधीची एफआरपीची देय रक्कमेपैकी टनास ४०३ रुपये प्रमाणे होणारी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात यापुर्वी अदा केलेली आहे. यामधील उर्वरीत देय रक्कम २०५ रुपये आज बँकेत वर्ग केली आहे.

त्याचप्रमाणे दिंनाक १६-१२-१८ ते ९-३-१९ या कालावधीत पुरवठा केलेल्या ऊसाची एफआरपीची देय रक्कम टनास ६०८ रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर आज वर्ग केली आहे. तसेच कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी सर्वानी ऊस पाठवून ७ लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन खा.  न संजय मंडलिक यांनी केले.

1,731 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे