Breaking News

 

 

रंकाळा स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे : आयुक्तांचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रंकाळा तलाव कधीही कचरा व गाळामुळे प्रदुषणयुक्त होणार नाही. यादृष्टीने जागरुक होऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज (सोमवार) केले. ते रंकाळा तलावाच्या पुर्वेकडील श्रमदान मोहिमेतंर्गत गाळ काढणे आणि स्वच्छतेच्या शुभारंभावेळी बोलत होते.

आज सकाळी सात वाजल्यापासून महापालिकेच्या यंत्रणेद्वारे रंकाळा तलावा जवळील तांबट कमान, संध्यामठ येथील गाळ काढून येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी एक जेसीबी, दोन डंपर यांच्या सहाय्याने रंकाळा तलावातील अंदाजे सात ते आठ डंपर गाळ व प्लॅस्टिक कचरा काढण्यात आला. हा गाळ व कचरा काढल्याने पाण्याचे होणारे प्रदुषणही कमी होण्यासाठी मदत होणार आहे. रंकाळा तलाव संपुर्ण स्वच्छता होईपर्यत ही मोहिम सुरु रहाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

या मोहिमेमध्ये लोकांचा उत्स्फुर्त सहभाग व्हावा यासाठी शाळा व कॉलेज विद्यार्थी, तालीम व तरुण मंडळे, महिला बचत गट, शहरातील निरनिराळे असोशिएशन्स्, हॉटेल्स व्यावसायीक, रंकाळा सभोवती रहाणारे रहिवाशी तसेच शहरातील जनतेनेही या  मोहिमेमध्ये सहभागी होऊन स्वच्छतेस हातभार लावावा. रंकाळा तलाव कधीही कचरा व गाळामुळे प्रदुषणयुक्त होणार नाही. यादृष्टीने जागरुक होऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

या स्वच्छता मोहिमेत नगरसेवक अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, परवाना अधिक्षक राम काटकर, अर्किटेक इंजिनियरचे माजी अध्यक्ष अजय कोराणे, पारस ओसवाल, उदय गायकवाड, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते व नागरीक यांनी उत्सफुर्त सहभाग घेतला.


468 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश