Breaking News

 

 

कोल्हापूरात बंद पाडले आक्षेपार्ह चित्रप्रदर्शन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवपुत्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील मुंबई येथील एका संस्थेने कोल्हापूरातील शाहू स्मारक भवन मध्ये चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनातील काही चित्रे छ. संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह असल्याने हे प्रदर्शन बंद पाडून संयोजीका स्मृती शिरसाट यांना पोलीसांच्या ताब्यात आज (सोमवार) देण्यात आले.

छ. संभाजी राजे यांच्यावर शाहू स्मारक भवनमध्ये मुंबईच्या आर्ट रिव्होल्यूशन या संस्थेमार्फत ‘द अनडिफीटेड सेंकड किंग ऑफ स्वराज्य संभाजी’ या नावाने चित्र प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनातील काही चित्रे संभाजी राजांवरील विंडबनात्मक असल्याचे काही रसिकांना निदर्शनास आले. याबाबत संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना कळवल्यानंतर हे कार्यकर्ते शाहू स्मारक येथे आले. त्यांनी या चित्रांची पडताळणी करुन आक्षेपार्ह असल्याचे लक्षात आल्यानंतर संयोजीका स्मृती शिरसाट यांना धारेवर धरले.

त्यांनी झालेली चूक मान्य करुन ही चित्रे काढून घेण्याची कबुली दिली. तरीही ऐतिहासिक महान व्यक्तीच्या बदनामीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून त्यांना भवानी मंडपात संयोगिता राजे यांच्या समोर म्हणणे मांडण्यासाठी उभे करण्यात आले. तेथेही शिरसाट यांनी झाल्या प्रकाराची कबुली दिली.

यातील आक्षेपार्ह चित्रे ताब्यात घेवून ती चित्रे व संयोजीका स्मृती शिरसाट यांना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी ही चित्रे रेखाटणारा दिपक विनोद आणि प्रकाश गुप्ता यांना अटक केल्याशिवाय शिरसाट यांना सोडू नये, अशी मागणी केली.

यावेळी शहाजी माळी, संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, विकी जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता पाटील उपस्थित होत्या.

642 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा