Breaking News

 

 

पराभवानंतर नाना पटोलेंचे पुन्हा ‘बचेंगे तो और भी लडेंगे’

नागपूर (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचे संकेत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिले आहेत. तसेच राज्यात काँग्रेसची जबाबदारी दिल्यास ती देखील स्वीकारण्यास तयार असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितले. ते आज (सोमवार) पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाने आदेश दिल्यानेच लोकसभा नागपुरातून लढलो. पक्षाने आदेश दिला तर विधानसभा देखील लढण्यास तयार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

नाना पटोले म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी निष्पक्ष पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप केला आहे. यामुळेच माझ्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या विरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहे. राजकारणातून निवृत्तीचा कुठलाही विचार नसून विरोधक म्हणून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

585 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे