Breaking News

 

 

अशोक चव्हाणांनंतर पंजाब, झारखंड, आसाम प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरु झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा सादर केला आणि आता राज्य प्रदेश प्रभारी राजीनामा देत आहेत. महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर आसामपासून पंजाबपर्यंत आणि मध्य प्रदेशपासून राजस्थानपर्यंतचे दिग्गज नेत्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. आतापर्यंत १३ वरिष्ठ नेत्यांनी आपला राजीनामा राहुल गांधींकडे पाठवला आहे.

राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण काही वृत्तांनुसार, राहुल अजूनही राजीनाम्यावर अडून आहेत. असंही म्हटलं जात आहे की राहुल यांनी काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांना आपली रिप्लेसमेंट शोधायला सांगितली आहे. महाराष्ट्रात पक्षाचे प्रभारी अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामा देण्याची घोषणा केली. पंजाब काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखड, झारखंड काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार आणि आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी आज (सोमवार) आपले राजीनामे राहुल गांधींकडे पाठवले.

357 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा