Breaking News

 

 

आदित्य ठाकरेंनी विधानसभा लढवावी : शिवसैनिकांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. युवासेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर या संदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे.

नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे आता शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने शिवसेनेकडून हालचाली चालू सुरु झाल्या आहेत. दरम्यान, युवासेना सरचिटणीस वरूण देसाई यांनी इन्स्टाग्रामवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ‘हीच वेळ आहे, हीच संधी आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय’, असे म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोअर कमिटीकडून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यावेळी खुद्द आदित्य ठाकरेंनीच या चर्चांना पूर्णविराम दिला होता. यावेळी या विषयावर उद्धव ठाकरेंना विचारले असता, आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी किंवा नाही याचा सर्वस्वी निर्णय त्यांचाच असल्याचे स्पष्ट केले होते.

411 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे