Breaking News

 

 

विख्यात अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण (वय ८५) यांचे आज (सोमवार) सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. अभिनेता अजय देवगण याचे ते वडील होत. वीरू देवगण यांच्यावर सांताक्रूझ येथील सूर्या रुग्णालयात उपचार सुरू होते.

इन्कार, मि. नटवरलाल, क्रांती, शहेनशहा, हिंमतवाला, त्रिदेव, बाप नंबरी बेटा दस नंबरी, फुल और काँटे यासह सुमारे ८० हून अधिक चित्रपटातील अॅक्शन दृश्यं त्यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली होती. प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव असतानाही त्यांनी हिंदी चित्रपटात अनेक हटके अॅक्शन आणल्या. त्यामुळं त्यांची वेगळी ओळख निर्माण केली होती. १९९९ साली त्यांनी ‘हिंदुस्तान की कसम’ हा चित्रपटही दिग्दर्शित केला होता. त्यात अमिताभ बच्चन, अजय देवगण, मनीषा कोइराला, सुष्मिता सेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

वीरू देवगण हे बॉलिवूडमधील पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये रमत नसत. अशा ठिकाणी ते क्वचितच दिसत. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यांच्या निधनाने एक गुणी अॅक्शन डायरेक्टर गमावला असल्याची प्रतिक्रिया हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांकडून व्यक्त होत आहे. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

636 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे