Breaking News

 

 

मोदींच्या ‘त्या’ दाव्याला एअर मार्शल नंबियार यांचा दुजोरा

भटिंडा (वृत्तसंस्था) : ढगाळ वातावरणामुळे भारतीय वायूदलाचे अधिकारी बालाकोट हल्ल्याची योजना पुढे ढकलायच्या विचारात होते. परंतु, ढगांमुळे रडारपासून विमानांचा बचाव होईल, असे मी त्यांना सांगितले. त्यामुळे नियोजित दिवशीच बालाकोट एअर स्ट्राईक झाला, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या दाव्यावरून अनेकांनी मोदींची खिल्ली उडविली होती. परंतु मोदींच्या या दाव्याला एअर मार्शल नंबियार यांनी दुजोरा दिला आहे. एका वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.

मात्र, आता एअर मार्शल रघुनाथ यांनी मोदींच्या समर्थन म्हटले आहे की, आकाशात ढगांची खूप दाटी असेल तर एखाद्या विमानाचा शोध लावण्यात रडारला अडथळे येऊ शकतात.

लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही केरळमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली होती. प्रत्येक रडार वेगवेगळ्या तंत्रज्ञानानुसार काम करते. त्यामुळे काही रडारमध्ये ढगांच्या पल्याड जाण्याची क्षमता असते तर काहींमध्ये नसते. रडार हाताळण्याच्या पद्धतीवरही ढगांच्या पलीकडे जाऊन विमानाचा शोध घेतला जातो की नाही, ही गोष्ट अवलंबून असते. त्यामुळे कधी तरी ढग असूनही विमानांचा पत्ता लागतो किंवा कधीतरी लागत नाही, असे रावत यांनी म्हटले होते.

627 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *