Breaking News

 

 

लोकसभेतील ‘या’ सर्वाधिक ग्लॅमरस खासदाराची सोशल मिडीयावर धूम !

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी जाहीर झाले. राजकीय विश्लेषकांचे अंदाज धुळीला मिळवत तब्बल ३५२ जागांवर एनडीएचे खासदार विजयी झाले. या निकालाचे खास वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच विक्रमी संख्येने म्हणजे तब्बल ७८ महिला लोकसभेत खासदार म्हणून पोहोचल्या आहेत. अर्थात, यात सर्वपक्षीय महिलांचा समावेश आहे. सेलिब्रिटी तसेच अभिनेत्रींना खासदारकीचे तिकीट देण्यात कोणताच पक्ष मागे नव्हता. सर्वाधिक ग्लॅमरस खासदार लोकसभेत पोहोचल्या आहेत. त्यांचे नाव आहे, मिमी चक्रवर्ती. सोशल मिडियावर त्यांचीच चर्चा आहे.

यंदाच्या लोकसभेमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत कौर-राणा या संसदेत पोहोचलेल्या महाराष्ट्रातील ग्लॅमरस खासदार आहेत. नवनीत या पूर्वाश्रमीच्या  अभिनेत्री आहेत. हेमामालिनी, स्मृती इराणी या अभिनेत्री खासदारांमध्ये आता बंगाली चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांची भर पडली आहे. मिमीने २००८ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दशकभराच्या कारकिर्दीत ती आघाडीची अभिनेत्री बनली आहे. पश्चिम बंगालमधील जाधवपूर या मतदारसंघातून मिमीने तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकलीही. सोशल मिडियावर मिमीचे आकर्षक पोझेसमधील फोटो व्हायरल होत असून देशातील सर्वांत सुंदर आणि ग्लॅमरस खासदार असा त्यांचा उल्लेख होत आहे.

3,387 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे