Breaking News

 

 

अयोध्येतील राम मंदिराबाबत मोहन भागवतांचे सूचक वक्तव्य !

उदयपूर (वृत्तसंस्था) : ‘आता प्रभू रामाचे काम करायचे आहे. रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही केली जाईल’, अशा सूचक शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिराचा राग आळवला आहे. अर्थात, त्यांनी राम मंदिराचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख त्या दिशेनेच असल्याचा कयास बांधला जात आहे. उदयपूर येथे संघाच्या द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या व्यासपीठावरून बोलताना त्यांनी या संदर्भातील संकेत दिले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अयोध्येतील राम मंदिराविषयी मौन बाळगणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आता पुन्हा एकदा या मुद्द्याला हात घातला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा मार्गी न लागल्यामुळे संघाने भाजप सरकारच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता भाजपने पुन्हा एकदा बहुमताने सत्ता प्राप्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी केलेल्या या वक्तव्याला अधिक महत्त्व आले आहे.

सध्या सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर-बाबरी मशीद हा खटला प्रलंबित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्याशिवाय राम मंदिरसाठी अध्यादेश काढता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली असून सरसंघचालकांच्या वक्तव्यानंतर मोदी सरकार आपल्या भूमिकेत बदल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

510 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश