Breaking News

 

 

आता ‘५ जी’ सीम कार्ड होणार लाँच…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधील दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या चीन युनिकॉमने झिगुंग या समूहासोबत भागीदारी करत ‘५ जी’ सीम कार्ड लाँच केले आहे. हे जगातील पहिलं ५ जी सीम कार्ड असल्याचा कंपनीचा दावा आहे. तब्बल १ टीबी इतकी या सीम कार्डची क्षमता असणार आहे. जास्त क्षमतेमुळे या सीममध्ये व्हिडिओ, म्युझिकसारख्या मोठ्या फाईल्सही स्टोअर करता येणे शक्य होणार आहे. हे सीम कार्ड वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

हे सीम कार्ड एंटरप्राइज ग्रेड इनक्रिप्शन सिस्टिमनुसार असणार आहे. त्यामुळे युजर्सना अतिरिक्त डेटा प्रोटेक्शन मिळेल. हे सीम कार्ड नेमकं कधी उपलब्ध होईल याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नसली तरी ५ जी कनेक्टिव्हीटी असणाऱ्या फोनमध्येच या सीमचा वापर करता येणार आहे. चायना युनिकॉम कंपनी ५ जी नेटवर्क ऑक्टोबर २०१९ मध्ये लाँच करणार आहे. हे पहिले ५ जी सीम कार्ड आहे जे ३२ जीबी, ६४ जीबी आणि १२८ जीबीच्या पर्यायासह उपलब्ध असणार आहे. आगामी काळात या सीम कार्डच्या स्टोअरची क्षमता ५१२ जीबी आणि १ टीबी असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

942 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *