कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील तलाठी (चावडी) कार्यालयाच्या नियोजित इमारतीच्या स्लॅबचा प्रारंभ आज (सोमवारी) झाला. या इमारतीमध्ये तलाठी ऑफिस, मंडल कार्यालय, रेकॉर्ड रूम, अभिलेख कक्ष, पार्किंग व्यवस्था यांचा समावेश असून, या इमारतीसाठी रुपये ८० लाख इतका निधी खर्च करण्यात येणार आहे.

यावेळी आ. जयश्री जाधव, श्रीराम सोसायटीचे चेअरमन हिंदुराव ठोंबरे, व्हाईस चेअरमन सविता रणदिवे, उपअभियंता महेश कांजर, शाखा अभियंता राजेंद्र वारके, माजी नगरसेवक संदीप नेजदार, सुभाष बुचडे, मोहन सालपे, तलाठी सुरेश पाटील व दीपक मंगसुळीकर, गजानन बेडेकर, भानुदास शिंदे तसेच श्रीराम सोसायटी सर्व संचालक आणि माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.