Breaking News

 

 

इम्रान खान यांचा मोदींना फोन…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातल्या विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी शुभेच्छा संदेश दिले आहेत. मोदींना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (रविवार) फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी  दोन्ही देश लोकांच्या भल्यासाठी मिळून काम करतील, अशी अपेक्षा इम्रान खान यांनी व्यक्त केली.

आज इम्रान खान यांनी मोदींना फोन करुन लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यामध्ये मोदींसोबत काम करण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही देशांत शांतता आणि समृद्धीसाठी हिंसामुक्त, दहशतवादमुक्त वातावरणाची खूप आवश्यकता आहे, असे प्रत्युत्तर नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना दिले.

पुलवामा हल्ला आणि एअरस्ट्राइकनंतर दोन्ही देशाच्या पंतप्रधानांमध्ये पहिल्यांदाच फोनवर चर्चा झाली. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. त्यामध्ये ते म्हणतात. दक्षिण आशियात शांतता, विकास आणि समृद्धीसाठी इम्रान खान पंतप्रधान मोदींसोबत काम करण्यास इच्छुक आहेत.

189 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा