Breaking News

 

 

खासदारांनी व्हीआयपी संस्कृतीपासून लांब रहावे : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. यावेळी मोदींनी, खासदारांनी व्हीआयपी संस्कृतीपासून लांब रहावे. तर दिवंगत माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांची ओळख ही साधेपणाची होती, असे मोदी म्हणाले.

यावेळी मोदी म्हणाले, खासदारांना व्हीआयपी संस्कृतीपासून लांब रहावे. देशातील लोकांना व्हीआयपी संस्कृतीचा राग आहे. आपणही नागरिक आहोत, मग आपण रांगेत उभे राहू शकत नाही का ? असा सवालही मोदींनी विचारला. तुम्ही विमानतळावर जाता, खासदार असल्याने तुमची कोणी तपासणी केली तुम्हाला राग येतो. पण यात गैर काय आहे, असेही मोदी म्हणाले.

तसेच आपल्याला जनतेला पाहून बदलायला हवं. लालदिवा हटवल्याने आर्थिक फायदा झाला नाही. पण जनतेत एक चांगला संदेश गेला, असे मोदींनी म्हणाले. आपल्याला एक ठराविक वर्ग निवडून आणत नाही. देशातील जनताच आपल्याला निवडून देते. आपण जे काही आहोत ते मोदींमुळे नाही तर या देशाच्या जनतेमुळे असल्याचे मोदी म्हणाले.

507 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा