Breaking News

 

 

निवडणुकीतील पराभवामुळे राजकीय गुलामी संपुष्टात : प्रकाश आंबेडकर

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवासोबत राजकीय गुलामी ही संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवरच झाली पाहिजे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, जागा वाटपावरून ही बोलणी फिस्कटली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीत याचा मोठा फटका बसला होता. प्रकाश आंबेडकरांनी घडवलेल्या दलित-मुस्लिम एकीने आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फोडली. प्रकाश आंबेडकरांनी सर्व ४८ मतदार संघांमध्ये उमेदवार उभे केले होते. यातून प्रकाश आंबेडकरांनी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादीच नव्हे, तर भाजपा आणि शिवसेनेला त्यांची दखल घ्यावीच लागणार आहे.

नांदेडमध्ये भाजपाचे प्रतापराव चिखलीकर सुमारे ४० हजार मतांनी विजयी झालेत. येथे वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगरे यांनी तब्बल १ लाख ३७ हजारांपेक्षा अधिक मते मिळवली. या सगळ्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची जाणीव सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काय प्रयत्न करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

348 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे