कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या विकासकामाला गती मिळावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेवून कामाचे नियोजन केले जात आहे. विकासकामे दर्जेदार व्हावी याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होण्यासाठी भागातील नागरिकांनीही लक्ष द्यावे असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले. त्या कोल्हापुरातील वांगी बोळ येथील रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभावेळी बोलत होत्या.

आ. जाधव म्हणाल्या, या कामांचे उद्घाटन करताना मला मनापासून आनंद झाला. कारण विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी येथील पाण्याची आणि रस्त्याची समस्या नागरिकांनी व्यक्त केली होती. या समस्या दूर करण्याच्या आश्वासन आमदार सतेज पाटील यांनी दिले होते. या कामाच्या मंजुरीसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला. या कामाला मंजूरी मिळाली आणि आज या कामाचा शुभारंभ सर्वांचा साक्षीने होत आहे.

तसेच शहरातील सर्वच कामे गुणवत्तापूर्ण व उच्च दर्जाची झाली पाहिजेत. अशा सूचना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दिलेत. तसेच हे काम गुणवत्तापूर्ण होत व्हावे याकडे या भागातील नागरिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, करण शिंदे, माजी नगरसेवक विक्रम जरग, अजित ठाणेकर, इंद्रजित बोंद्रे, सुजय पोतदार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, दिलीप माने, विजय जाधव, हेमंत आराध्ये, प्रसाद जमदग्नी आदी उपस्थित होते.