Breaking News

 

 

राज्यात उष्माघाताने ७ जणांचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. उष्माघातामुळे राज्यात तब्बल ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४४० रुग्णांवर उपचार सुरू आहे. तापमान वाढल्यामुळे नागरिकांमध्ये पोटांचे विकार, घशाचे संसर्ग वाढत आहे.

२३ मे रोजी संभाजीनगरमध्ये उष्माघाताने एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संभाजीनगरध्येच एकूण दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंगोलीत दोन आणि परभणी, बीड आणि धुळ्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला आहे.

अकोल्यात उष्माघाताने १८६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ही सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये नागपूरात १५६, लातूरात ६८ तर नाशिकमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते एप्रिल महिन्यात मुंबईत २७७७ रुग्ण हे पोट विकाराचे आढळले आहेत. शिळे अन्न खाऊ नका असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

192 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे