Breaking News

 

 

केरळमध्ये गुप्तचर विभागाचा हायअलर्ट…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  केरळमध्ये पुन्हा एकदा इसिस या दहशतवादी संघटनेच्या हलचाली वाढल्या आहेत. काल (शनिवार) रात्री केरळच्या समुद्र किनाऱ्यावर इसिसच्या दहशतवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर विभागाने हायअलर्ट दिला आहे.

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरळ पोलिसांनी किनारपट्टी भागात अलर्ट दिला आहे. यासाठी सिनिअर अधिकारी देखील तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गुप्तचर विभागाकडून आम्हाला अनेक वेळा अलर्ट दिला जातो.

पण यावेळी दहशतवाद्यांच्या संख्येसह अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळेच या संदर्भात तातडीने कारवाई करत किनारपट्टी भागाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. किनारपट्टी भागातील पोलिसांनी सांगितल्यानुसार यासंदर्भात काही दिवसांपूर्वी अलर्ट मिळाला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जात आहे.

294 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे