Breaking News

 

 

कुणालच्या नेत्रदानामुळे गडहिंग्लज तालुक्यात चळवळीने गाठले ‘अर्धशतक’

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील कुणाल वसंत जाधव (वय १३) या शाळकरी मुलाचे आज (शनिवार) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. हे तालुक्यातील चळवळीतील पन्नासावे नेत्रदान ठरले.

अत्याळ येथे गावात साडेसहा वर्षापुर्वी नेत्रदान चळवळीला सुरवात झाली. त्यानंतर पंचक्रोशीत चळवळीला चांगला प्रतिसाद मिळू लागला. चळवळीत  आतापर्यन्त ४९ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहेत. ऐनापूर येथील कुणाल जाधव या सहावीत शिकणाऱ्या कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. मुलाच्या मृत्यूचे दु:ख सहन करीत जाधव परिवाराने त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. सीपीआरमधील डॉक्टरांनी नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली ऐनापूरमधील हे तिसरे तर चळवळीतील ५० वे नेत्रदान ठरले. कुणालच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

1,548 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश