मुंबई (प्रातिनिध) : महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याचे साठे असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये व्यावसायिक कोळसा खाण लिलाव आणि खाण क्षेत्रातील सोन्यासारख्या संधी या विषयीच्या गुंतवणूक परिषदेत शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात कोळसा, बॉक्साईट, लोखंड खनिजासह सोन्याचे साठे असल्याचा केंद्रीय खाण विभागाचा अहवाल आला आहे. त्यासाठी टेस्टिंग सुरु झाले आहे. महाराष्ट्रात सोन्याचे दोन साठे आहेत. असे समजल्यावर केंद्राच्या सहकार्याने संशोधन सुरु झाले आहे. चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात सोने साठे असणार आहेत. पैकी चंद्रपूर वन विभागाच्या संरक्षण क्षेत्रात येते. त्यामुळे तेथे खोदकाम होणार नाही; मात्र सिंधुदुर्गमध्ये खोदकाम होऊ शकणार आहे. शिंदे-फडणवीस काळात हे खाणकाम झाले तर महाराष्ट्रासाठी मोठा फायदा होईल, असे म्हटले जात आहे.