Breaking News

 

 

पराभवानंतर राष्ट्रवादीत विचारमंथन : प्रदेशाध्यक्षांनी मागवला अहवाल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक जिल्हा अध्यक्षांकडून अहवाल मागवले आहेत. बूथ प्रमुख आणि पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे छापील फॉर्मवर पाठवलेल्या माहितीच्या आधारे जिल्हाध्यक्षांना ३१ मे पर्यंत अहवाल करून प्रदेशाध्यक्षांकडे पाठवायचा आहे. यासाठी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याची बैठक घेऊन माहिती देण्यात आली. ८ जूनला पक्षाध्यक्ष शरद पवार मुंबईत सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेणार आहेत.

पराभवाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी प्रत्येक जिल्हाध्यक्षांना आदेश दिले आहेत. त्यानुसार बूथप्रमुख, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य नगरसेवक, शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आणि विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष यानी आपल्या बुथवर,   मतदारसंघात, प्रभागात, शहरात,झालेले मतदान, आघाडीला झालेले, युतीला झालेले, इतरांना झालेले मतदान, आघाडीला मतदान न होण्याची कारणे याची माहिती छापील फॉर्मवर भरून जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे द्यायची आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा अध्यक्ष अहवाल तयार करुन प्रदेश कार्यालयाकडे पाठवणार आहेत. जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे वेगवेगळे अहवाल देण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी दिले आहेत.

त्यानुसार ताराबाई पार्क येथील जिल्हा कार्यालयात जिल्हयातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. त्यांना सरचिटणीस अनिल साळोखे यांनी माहिती देऊन छापील फॉर्म दिले व दिलेल्या सूचनेनुसार माहिती भरून कार्यालयात जमा करण्यास सांगितले. या वेळी उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, आ. संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील, बाबूराव हजारे, मधुकर जांभळे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, संगीता खाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे