Breaking News

 

 

मंडलिकांना ‘कागल’मधून मताधिक्य देण्यात समरजीतसिंहांचा सिंहाचा वाटा !

कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे जाहीर झाला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक २ लाख ६९ हजार ७९८ इतक्या प्रचंड मतांनी विजयी झाले. प्रा. मंडलिक यांना मिळालेले मतदान पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वांत मोठा विजय म्हणून या निकालाकडे पाहिले जात आहे. कागल तालुक्यातून मंडलिक यांना सर्वाधिक ७१, ००० इतके मताधिक्य मिळाले. यामध्ये शाहू ग्रुपचे चेअरमन समरजीतसिंह घाटगे यांचा सिंहाचा वाटा आहे.

मागील २०१४ च्या  लोकसभा निवडणुकीत कागल तालुक्यातून प्रा. संजय मंडलिक यांना ९५०० चे लीड मिळाले होते. त्या वेळी प्रा. संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे एकत्रित होते. यावेळी युतीमुळे भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते व म्हाडा, पुणेचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांची साथ मिळाली. घाटगे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. तालुकावार आकडेवारी पाहता लोकसभा   मतदार संघाअंतर्गत  सहाही तालुक्यात चांगले मताधिक्य मिळाले. त्यामध्ये ७१००० इतके सर्वाधिक मताधिक्य कागल तालुक्यातून मिळाले. याचे एकमेव कारण म्हणजे भारतीय जनता पार्टी व शिवसेना या दोन्ही पक्षाची  झालेली युती होय.

नरेन्द्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी भारतीय जनता पक्षाचे तळागाळातील कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट, शिवसैनिकांची एकजूट, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निवडणूक डावपेच आणि  परिवर्तन करण्याच्या दृष्टीने लोकांनी केलेला निश्चय याही बाबी मंडलिक विजयी होण्यात तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मात्र मंडलिक यांना मताधिक्य मिळण्यामध्ये समरजीतसिंह घाटगे यांचा सिंहाचा वाटा आहे, हे दुर्लक्षित करून चालणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे