Breaking News

 

 

सुहास खामकर यांना शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार

टोप (प्रतिनिधी) : टोप येथील शिवप्रेमी ग्रुपतर्फे देण्यात येणारा शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांना जाहीर झाला आहे. सदरचा पुरस्कार निवृत्त अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते सोमवारी (ता.२७) सायंकाळी सात वाजता कल्लेश्वर चौक येथे होणाऱ्या कार्यक्रमात दिला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, अभयकुमार वंटे, पुंडलिकराव जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नामवंत व्यक्तींना शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

कार्यक्रमात जीवरक्षक दिनकर कांबळे, शाहिरी विशारद आझाद नायकवडी, मंडल अधिकारी गणेश बरगे, मोडीतज्ञ राजेंद्र मोरे, स्नेहल पाटील, सविता धोत्रे, अनुश्री भरमगोंडा, दिपक वागवे, लघुपट फिल्मफेअर मेकर सचिन सूर्यवंशी, अमृता जाधव यांचाही  सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी महेश चव्हाण, शिरोलीचे उपसरपंच सुरेश यादव, उपाध्यक्ष नितीन ढवाळे, सूर्यकांत ढवाळे, बाबासाहेब अस्वले उपस्थित होते.

489 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा