Breaking News

 

 

नारीशक्तीचा आवाज बुलंद : नव्या लोकसभेत महिला खासदारांची विक्रमी संख्या !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सतराव्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने घवघवीत यश मिळवले. नरेंद्र मोदी हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनणार हे निश्चित आहे. अनपेक्षित निकाल हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लोकसभेत मोठ्या संख्येने महिला खासदार दिसणार आहेत. देशाच्या इतिहासात प्रथमच विक्रमी संख्येने म्हणजे तब्बल ७८ महिला ‘खासदार’कीची निवडणूक जिंकल्या आहेत. हे प्रमाण १४.५ टक्के इतके आहे. त्यामुळे प्रथमच लोकसभेत ‘नारी’शक्तीचा हुंकार घुमणार आहे. हे प्रमाण

देशभरातून एकूण ७२४ महिला उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यापैकी भाजपासह विविध पक्षाच्या ७८ महिला जिंकल्या. ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, हेमा मालिनी, किरण खेर, मनेका गांधी, सुप्रिया सुळे या महिला खासदारांनी यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह यांचा तर स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करीत देशाला थक्क केले. लॉकेट चॅटर्जी या बंगाली अभिनेत्रीही तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या.

फक्त भाजपाच नव्हे, सर्व पक्षांच्या पक्षाच्या मिळून एकूण ७८ महिला खासदार यावेळी जिंकून आल्या आहेत. या महिला खासदारांमध्ये भाजपा, तृणमूल, बिजू जनता दल या पक्षांमधल्या महिला उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. १९५२ मध्ये महिला खासदार निवडून येण्याचं प्रमाण सर्वात कमी होतं. यावेळी म्हणजेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासह विविध पक्षाच्या ७८ महिला खासदार निवडून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे