Breaking News

 

 

सर्वसामान्यांच्या हितासाठीच आरोग्य शिबिराचे आयोजन : आ. आबिटकर

धामोड (प्रतिनिधी) : विविध विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे हे आमचे आद्य कार्य आहे. आरोग्याची सेवा हिच खरी सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आरोग्य शिबीराचा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात लाभ घेता यावा. याच मुख्य उद्देशाने हे शिबीर राबवण्यात येत असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ते कै. सुशीलादेवी आनंदराव आबिटकर हेल्थ फौंडेशनतर्फे आयोजित राधानगरी विधानसभा मतदारसंघातील विस गावामधील आरोग्य शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धामोडचे सरपंच अशोक सुतार, सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब नवणे प्रमुख उपस्थित होते. यावेळी केळोशी बुद्रूकचे सरपंच के एल पाटील, बाळासाहेब नवणे, राजाराम साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन एल एस पाटील, डे. सरपंच सारीका कुरणे, माजी डे सरपंच संभाजी लाड, आनंदराव जाधव,  ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

816 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा