Breaking News

 

 

पाच हिंदू पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व

मुंबई (प्रतिनिधी) : पाच हिंदू पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. मंत्रालयात त्याचे प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले. यात अमरावतीच्या राणीबाई केसवाणी, शांतीबाई केसवाई आणि अनिता केसवाणी यांना नागरिकत्व देण्यात आले आहे. तसेच जळगावच्या रिटाबाई सिंधी व कोल्हापूरच्या प्रयाणा मुलचंदानी यांनाही भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. गेली वीस वर्ष भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी प्रयत्न करत होते.

ज्यावेळी या  भारताच्या नवीन नागरिकांना प्रमाणपत्र सुपुर्द केले. तेव्हा गृह खात्याचे अतिरिक्त सचिव अमिताभ गुप्ता आणि जळगावचे माजी आमदार गुरुमुख जगवाणी उपस्थित होते. या नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळावे यासाठी गुरुमुख जगवाणी प्रयत्न केले होते.

पाकिस्तानातील हिंदु अल्पसंख्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात यावा असा कायदाच केंद्र सरकारने २०१६ साली काढला होता. या कायद्यामुळेच या पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदुंना भारताचे नागरिकत्व मिळण्यास सोपे झाले अशी माहिती विभाग अधिकारी दीपक खरात यांनी दिली.

798 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash