Breaking News

 

 

मोदी पुन्हा सत्तेत आल्यामुळे दाऊद धास्तावला !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे दाऊदने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, २०१४ साली भाजपची सत्ता आल्यानंतर सरकारने दाऊदभोवतीचा फास आवळायला सुरुवात केली होती. दाऊदची संपत्ती जप्त करण्याबरोबरच त्याच्या अनेक साथीदारांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला होता. या सगळ्यामुळे पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊदची प्रचंड कोंडी झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दाऊद यंदाच्या निवडणुकीत सत्तापालट होईल, याकडे डोळे लावून बसला होता.  मात्र, यंदाच्या निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आले. त्यामुळे दाऊदला मोठा धक्का बसला आहे.

माजी पोलीस अधिकारी पी.के. जैन यांनी सांगितले की, मोदींच्या पुन्हा सत्तेत येण्याने अनेक समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे पाकिस्तान आणि दाऊद इब्राहिमवरील दबाव आणखी वाढणार आहे. कदाचित दाऊदला पाकिस्तानमधून पकडून आणण्यासाठी भारताकडून एखादी गुप्त मोहीम आखली जाऊ शकते. यासाठी अमेरिकेची सीआयए आणि इस्रायलची मोसाद या गुप्तहेर संघटना भारताची मदत करतील. त्यामुळे दाऊद प्रचंड घाबरला असल्याचे त्यांनी सांगितले. 

1,002 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग