Breaking News

 

 

भ्रष्टाचाराने बरबटलेला विरोधी पक्ष : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. भाजपाने ३०३ तर एनडीएने ३५० च्या वर जागा जिंकल्या आहेत. अशात भारताला एका चांगल्या आणि वैचारिकदृष्ट्या ठाम असलेल्या विरोधी पक्षाचीही गरज आहे. मात्र सद्या जो विरोधी पक्ष आहे तो भ्रष्टाचारी आणि मूर्ख आहे अशी टीका भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. यासंदर्भातला ट्विट करून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

आपल्याला ठाऊक आहेच की काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसवर टीका होता दिसते आहे. काँग्रेस पक्षातले दिग्गज नेतेही राहुल गांधी यांनाच या पराभवासाठी जबाबदार धरत आहेत.

भाजपाचा अभूतपूर्व विजय झालेला आहे. अशात मला असं वाटतं की देशाला एका चांगल्या, स्वच्छ प्रतिमा असलेल्या, बुद्धीमान विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. यामुळेच लोकशाहीचा आदर राखला जाईल असं मला वाटतं, मात्र सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचाराने बरबटलेला आणि मूर्ख आहे या आशयाचे ट्विट स्वामी यांनी केलं आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेली टीका काँग्रेसला चांगलीच झोंबली असणार यात शंका नाही. मात्र या टीकेला अद्याप तरी काँग्रेसने काहीही उत्तर दिलेले नाही. देशात अशी परिस्थिती निर्माण होईल हे निकालाच्या आधी विरोधकांपैकी एकाही दिग्गजाला वाटलं नव्हतं. मात्र या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे.

351 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे