Breaking News

 

 

…तर ‘या’ नेत्याची जागा कोण घेणार ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विजयाचे श्रेय जाते तसेच ते अमित शाह यांनाही जाते. अमित शाह यांना मोदींचा वजीर म्हणून ओळखलं जाते. त्यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आहे. मात्र नव्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होऊ शकतो. अशीही चर्चा रंगली आहे. जर अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला तर अमित शाह यांची जागा कोण घेणार याची चर्चा भाजपाच्या गोटात सुरू झाली आहे.

अमित शाह यांना केंद्रीय मंत्रिमंडळातलं अगदी महत्त्वाचं पद दिलं जाऊ शकतं अशीही चर्चा आहे. तसं ते दिलं जाणार की नाही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही संकेत दिलेले नाहीत. मात्र पत्रकारांशी बोलताना भाजपातल्या तीन दिग्गज नेत्यांनी अमित शाह यांना महत्त्वाचं स्थान केंद्रीय मंत्रिमंडळात असेल अशी शक्यता वर्तवली आहे.

भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे विरोधकांचे अक्षरशः पानिपत झालं आहे. दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेतील. त्यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असेल याची चर्चा रंगत आहे. शिवाय अमित शाह यांच्याबाबतही चर्चा रंगते आहे. अमित शाह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून पक्षाचे धोरण आणि एकंदरीत दिशाच बदलली आहे. त्यामुळे आता अमित शाह यांना मंत्रिपद दिल्यास त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार यावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.

891 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे