Breaking News

 

 

अखेर त्या हत्तीला ताळोबावाडीच्या जंगलात हुसकावण्यात यश…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील वाघराळे, महागांव, वैरागवाडी, हारळी या भागात गेले दोन दिवस जंगली हत्ती आल्याने घबराटीचे वातावरण पसरले होते. तो हत्ती वनखात्याने किणे (ता. आजरा) येथील जवळ असणाऱ्या ताळोबावाडी जंगलात त्याला हुसकवून लावण्यात अखेर यश मिळाले आहे.  

गेले दोन दिवस वन खात्याने तीन पथके हत्तीच्या मागे लावले होते. हा हत्ती वैरागवाडी, हारळे, महागांव, सुळे या ठिकाणी फिरत होती. आज दुपारी मासेवाडी येथे हत्तीने तळ ठोकला होता. त्यानंतर वनखात्याने त्या हत्तीला काळम्मावाडीच्या दिशेने हुसकावून लावले. आज तो जंगलात गेल्यामुळे येथील ग्रामस्थांनी निश्वास सोडला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे सहाय्यक वनसंरक्षक एम.बी. चंदनशिवे यांनी भेट देवून ग्रामस्थांची चौकशी केली.

180 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा