Breaking News

 

 

पालकमंत्र्यांकडून नूतन खासदारांच्या ‘या’ आहेत अपेक्षा !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी विद्यमान खासदारांना पराभूत करण्याची किमया साधली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (शुक्रवार) दोन्ही खासदारांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

या वेळी कै. बाळासाहेब माने खासदार असताना दिल्लीतील ज्या निवासस्थानी राहात होते, ते निवासस्थान आपणास मिळावे, यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी खा. धैर्यशील माने चंद्रकांतदादांकडे केली. तर खा. मंडलिक यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांनी दादांकडे केली. चंद्रकांतदादांनी याला प्रतिसाद देत दोन्ही मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

जिल्ह्यातील दोन्ही जागांवर भगवा फडकल्याने महायुतीच्या गोटात उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. आज सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन्ही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवून अभिनंदन केले. या वेळी दोघाही खासदारांनी त्यांना तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहिला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली.

चंद्रकांतदादा यांनी खा. धैर्यशील माने यांना ‘जनतेसाठी चांगले काम करा, मतदारसंघाचा विकास करा असा कानमंत्र दिला. तर माने यांनी आपण तुमच्या मार्गाने काम करणार आहोत असे सांगितले. यावेळी चांगल्या कामासाठी माझं नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन दादांनी दिले. माने यांनी स्व. खासदार बाळासाहेब माने हे दिल्लीत ज्या सरकारी बंगल्यात राहात होते, तो बंगला आपल्याला मिळावा अशी त्यांच्याकडे विनंती केली. यावर मी त्यासाठी निश्चितच प्रयत्न प्रयत्न करतो अशी ग्वाही त्यांनी दिली.  त्यानंतर दादांनी प्रा. संजय मंडलिक यांनाही जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावे, असा सल्ला दिला. तर संजय मंडलिक यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली.  

तर खा. मंडलिक यांनी तुमचा पाठिंबा असल्याशिवाय जिल्ह्यात कोणतीही गोष्ट होत नाही. त्यामुळे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे, अशी विनंती केली. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

2,373 total views, 6 views today

One thought on “पालकमंत्र्यांकडून नूतन खासदारांच्या ‘या’ आहेत अपेक्षा !”

  1. कोल्हापूर जिल्ह्यात भगवा फडकला. माझी मनिषा सफल झाली. *वंदे मातरम्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे