Breaking News

 

 

महापालिकेतर्फे उद्या केएमसी कॉलेजमध्ये दिव्यांग तपासणी शिबीर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेतर्फे उद्या (शनिवार) धोत्री गल्ली येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या इमारतीत दिव्यांग तपासणी शिबीर होणार आहे.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय, मंत्रालयामार्फत होणाऱ्या या शिबीरात दिव्यांगांची तपासणी करुन त्यांच्या व्यंगानूसार त्यांना उपयुक्त साधने  दिली जाणार आहेत. तपासणीनंतर पुढील दोन-तीन महिन्यात ही साधने मोफत दिली जाणार आहेत.

शिबीरात ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यंग व शहरातील रहिवाश्यांना गरजेनुसार व्हील चेअर, श्रवणयंत्र, लो व्हिजन किट,ट्रायसिकल, कॅलिपर, एमआर किट, डायसी प्लेअर, कुबडया, कृत्रीम अवयव, एल्बो क्रंचेस, स्मार्ट केन, कुबडया, कुष्ठरोग किट यासारखे साहित्य मोफत दिले जाणार आहे.

पुर्वी ज्यांना जिल्हा शल्यचिकित्सकांकडून दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांनी ते शिबीरावेळी आणणे आवश्यक आहे. याशिवाय   आधारकार्ड, वार्षिक उत्पन्न रुपये १ लाख ८० हजार पर्यंत असल्याबद्दलचा  तहसिलदार, गावकामगार तलाठी यांचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. १५ वर्षावरील मतिमंदांना प्रवेश असणार नाही. शनिवार (दि.२५) सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत हे शिबीर असणार आहे.

318 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश