Breaking News

 

 

नगरोत्थानमधील दहा वर्षापूर्वीची कामे स्थायीत मार्गी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नगरोत्थानमधील दहा वर्षांपूर्वीची कामे आज (शुक्रवार) स्थायी समितीच्या सभेत मार्गी लागले. या कामांसाठी ३५ टक्के जादा दराची निवीदा मंजूर करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख होते.

साळोखे नगर, कळंबा, फुलेवाडी, रिंगरोड येथील रस्त्यांच्या कामांसाठी नगरोत्थानमधून मंजूरी देण्यात आली होती. मात्र हे काम घेतलेल्या ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडून दिले होते. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून पूर्ण होवू शकले नव्हते. आजच्या स्थायी समितीच्या सभेत अखेर ही कामे मार्गी लावण्यात आली. ३५ टक्के जादा दराची दुसऱ्या ठेकादाराची निवीदा मंजूर करण्यात आली आहे. मात्र तोंडावर पावसाळा असल्यामुळे पावसाळ्यानंतरच हे काम प्रत्यक्षात सुरु होण्याची शक्यता आहे.

उपनगरात नाले सफाई का केली नाही. जेसीबी व डंपर मागणी करुनही मिळत नाहीत. आरोग्य निरिक्षक स्वप्निल उलपे हा नागरिकांना उर्मट भाषेत बोलतो, अशी तक्रार नगरसेविका दिपा मगदूम यांनी केली. त्यावर आरोग्य विभागाकडे दोन जेसीबी असून एक जेसीबी नाले सफाईसाठी तर दुसरा ४० प्रभागात व इतर कामासाठी वापरला जातो. त्यामुळे प्रभागात आठवडयातून एकच दिवस जेसीबी मिळतो.  आठवडयातून एक दिवस जेसीबी दिला नाही, तर संबंधीतावर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

आपटेनगर टाकीवर ५ लाख रुपयांची ताडपदरी घातली आहे. ती जगावेगळी आहे का ? अशी विचारणा दिपा मगदूम यांनी केली. या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र काम धोकादायक असल्याने जादा दराने निवीदा आल्या. त्याप्रमाणे काम केले आहे. मात्र ताडपदरी बदलून तिथे पत्रे टाकण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.  

याशिवाय माधुरी लाड यांनीही या सभेत प्रश्न उपस्थित केले.

261 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash