Breaking News

 

 

सिद्धार्थ नगर, पद्माराजे गार्डन प्रभागाची पोटनिवडणूक जाहीर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेतील सिद्धार्थ नगर (प्रभाग क्र. २८) आणि पद्माराजे गार्डन (प्रभाग क्र. ५५) या दोन नगरसेवकांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार रविवार दि. २३ जून रोजी मतदान होणार असून २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने कोल्हापूरसह राज्यातील उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक, मालेगाव, परभणी, चंद्रपूर येथील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

कोल्हापूरात सिद्धार्थ नगर प्रभागातील अफजल पिरजादे आणि पद्माराजे गार्डन प्रभागातील अजिंक्य चव्हाण हे दोघे अपात्र ठरल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३० मे पासून ६ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज विक्री व अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. २ जून (रविवार), ५ जून या दोन सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

७ जूनला अर्जाची छाननी व पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १० जूनपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे. ११ जूनला चिन्हांचे वाटप आणि रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. रविवार (२३) जूनला मतदान तर २४ जूनला मतमोजणी होणार आहे.

615 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग