Breaking News

 

 

सुरतमध्ये अग्नितांडव : १९ जणांचा मृत्यू

सुरत (वृत्तसंस्था) : गुजरातमधल्या सुरतच्या तक्षशिला इमारतीला आग लागून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सुमारे ७  विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे समजते. यावेळी इमारतीला लागलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांसह अनेकांनी वरुन उड्या मारल्या.

या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास आहे. हा क्लास सुरू असतानाच अचानक आग लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इमारतीवरुन उड्या टाकल्या. तसेच इतर काही लोकांनीही इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या टाकल्या.

तक्षशिला इमारतीत बरीच शॉपिंग सेंटर्सही आहेत. त्यामुळे या ठिकाणी लोकांची गर्दीही असते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना दुःख सहन करण्याची ताकद देव देवो आणि जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

999 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा