कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसापूर्वी लक्ष्मीपुरी येथील पन्हाळा पान शॉपचा फोटो सोशीलमीडिया वर व्हायरल झाला होता. या पानपट्टीला किल्ले पन्हाळगडाचे नाव देणे काही शिवभक्तांना रुचले नाही. मात्र, बऱ्याच लोकांनी याचा फोटो स्टेटस ठेवून निषेध व्यक्त केला होता. यावेळी शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांना काहीनी फोटो पाठवत आपण तो बोर्ड फाडून टाकण्याची विनंती केली.

परंतु, सुर्वे यांनी पानपट्टीचे मालक वसीम पन्हाळकर यांची भेट घेत त्यांना विनंती केली की, पन्हाळगडा विषयी आमच्या मनात आदराची भावना आहे. आपण दिलेले पानपट्टीला नाव हे शिवभक्तांना आवडलेलं नाही. तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही हे नाव बदलावे. पण, पानपट्टीच्या मालकांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वीच हा बोर्ड नवीन बसवला असून कर्ज काढून पानपट्टी सुरू केली आहे. आता माझ्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. यावेळी हर्षल सुर्वे यांनी बोर्डाचा खर्च मी स्वतः करतो पण नाव बदला अशी विनंती केली. ती विनंती पानपट्टीच्या मालकांनी स्विकारली.

आता त्या ठिकाणी पन्हाळकर वासिम पान भवन या नावाचा नवीन बोर्ड लागला आहे. आणि त्याचे उद्घाटन हर्षल सुर्वे, अश्किन आजरेकर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. यामुळे फक्त कोल्हापूरात काही प्रश्न जे जातपात न बघता फक्त भावनेच्या पलीकडे जाऊन सोडवले जातात. हे त्याचेच उदाहरण द्यावे लागेल.