कोणत्याही क्षणी लोकसभा होणार बरखास्त !

0 1

नवी दिल्ली (वृत्त्संस्था) : सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. आज (शुक्रवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने शिफारस केल्याने आता राष्ट्रपती कोणत्याही क्षणी लोकसभा बरखास्त करू शकतात. सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जून रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे ३ जूनच्या आधी सतरावी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असून त्या प्रक्रियेलाही आता वेग येणार आहे. तिन्ही निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना भेटून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची यादी त्यांच्याकडे सोपवणार आहेत. त्यानंतरच नव्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More