Breaking News

 

 

सरकारने कायदा करुन राम मंदिराची स्थापना करावी : मा.गो.वैद्य

नागपूर (प्रतिनिधी) : अयोध्येत राम मंदिराबाबतचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने हा मुद्दा बाजूला ठेवला तर सरकारने याबाबत कायदा करून राम मंदिराचे निर्माण करावे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते व ज्येष्ठ विचारक मा.गो वैद्य यांनी व्यक्त केले. तर काँग्रेस हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून यायला पाहिजे होता, असे वक्तव्यही त्यांनी केले.

मा.गो.वैद्य म्हणाले, भाजपच्या या यशाचा आम्हाला आंनद आहे, परंतु लोकशाहीत सामान दर्जाचे दोन पक्ष आवश्यक असतात. भाजप सत्तेत आहे, तर काँग्रेस हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून यायला हवा होता. अयोध्येत राम मंदिराबाबतचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.  न्यायालयाने हा मुद्दा बाजूला ठेवला तर सरकारने याबाबत कायदा करून राम मंदिराचे निर्माण करावे. राम मंदिर हा राजकारणाचा विषय नसून हा श्रद्धेचा व भावनेचा विषय आहे. सरकारच्या या पाच वर्षाच्या कार्यकाळात योग्य निर्णय घेईल, असे मत व्यक्त केले.  

345 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश