Breaking News

 

 

दारूण पराभवानंतर काँग्रेसमध्ये नेत्यांचे राजीनामासत्र !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नेत्यांच्या राजीनामा सत्रास प्रारंभ झाला आहे. उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी घेत अभिनेते राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बब्बर यांच्यापाठोपाठ ओडिशाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला दणदणीत यश मिळाल्यानं काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनेक राज्यांमध्ये तर काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही. देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला आहे. भाजप उमेदवार राजकुमार चाहर यांनी बब्बर यांचा तीन लाखाच्या मताधिक्याने पराभव केला आहे.

त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अमेठीचे जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे त्यांचा राजीनामा सादर केला आहे. 

1,197 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे